Saturday, January 24News That Matters

Author: Admin Admin

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेच्या विशेष बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेच्या विशेष बैठक

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेच्या मुंबईतील सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवारी मुंबईतील रामटेक बंगल्यावर पार पडली.  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व नवनिर्वाचित आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे याप्रसंगी विशेष कौतुक केले. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक महायुती म्हणून सक्षमपणे लढून विजयी होण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन देखील यासमयी केले.  गेल्या अडीच वर्षात राज्य शासनाने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय, मुंबईत गतीमान केलेले मेट्रो, कोस्टल मार्ग, एमटीएचएल असे लोकोपयोगी पायाभूत सुविधा प्रकल्प, खड्डेमुक्त रस्ते, आरोग्य सुविधा, मुंबईतील सुशोभीकरण, नवीन रुग्णालये, कोळीवाड्यांचा केलेला विकास, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावे तसेच ...
असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी    ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी विभागप्रमुख बबन मोरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....
शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख तसेच आमचे मार्गदर्शक रघुनाथ मोरे साहेब यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.

शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख तसेच आमचे मार्गदर्शक रघुनाथ मोरे साहेब यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे संस्कार जिवापाड जपून शिवसेना पक्षाला वृद्धिंगत करणारे आदरणीय नेते, शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख तसेच आमचे मार्गदर्शक रघुनाथ मोरे साहेब यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मोरे साहेब यांचे जावई, नातू तसेच कुटूंबातील इतर सदस्य उपस्थित होते....
बुद्धिबळाच्या पटलावर भारतीय डी.गुकेश बनला राजा…

बुद्धिबळाच्या पटलावर भारतीय डी.गुकेश बनला राजा…

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी  जगाच्या पटलावर भारताची बुद्धिमत्ता पुन्हा एकदा तेजाने झळकली. भारतीय बुद्धीबळपटू डी.गुकेश याने चीनचा ग्रँडमास्टर लिरेनला चेकमेट करत रचला नवा इतिहास. सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा डी.गुकेश विश्वविजेता ठरला. त्याने अटीतटीच्या लढतीत चीनी प्रतिस्पर्धी डिंग लिरेनवर दणदणीत मात केली आहे. तमाम भारतवासीयांसाठी ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. त्याचा खेळ देशातल्या बुद्धिबळपटूंना नेहमीच प्रेरणा देणारा ठरेल. या ऐतिहासिक आणि देदीप्यमान कामगिरीबद्दल डी.गुकेश यांचे हार्दिक अभिनंदन आणि बुद्धिबळ खेळातील भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. ...
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण केले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधानमंडळाच्या अधिवेशनात अभिभाषण केले.

Gujarat
हिन्द टीवी - मराठी      विधानमंडळ येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. 
राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात

राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात

Gujarat
हिन्द टीवी - मराठी        राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एन. एच. पाटील, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के. के. तातेड, आयोगाचे सदस्य संजय कुमार व एम. ए. सईद, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, आयोगाचे सचिव नितीन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २०२४ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मानवी हक्क दिनाची या वर्षाची संकल्पना 'अवर राईट्स, अवर फ्युचर, राईट नाऊ' अशी आहे. कार्यक्रमात अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाचं पुनर्वसन, दिव्...
कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीर चक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या २५ वर्षपूर्ती

कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीर चक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या २५ वर्षपूर्ती

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीर चक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला.  विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी कॅप्टन यादव यांनी कारगिलच्या युद्धात ग्रेनेडियर म्हणून बजावलेल्या पराक्रमाचे कौतुक केले.  यावेळी महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते कॅप्टन यादव यांच्या पत्नी श्रीमती रीना यादव यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला तसेच राज्यपालांनी दोघांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आश्रयदाता डॉ. अश्विनी भिडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला....
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी  विकासाचा दीपस्तंभ हरपला      महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या रुपाने आधुनिक भारताच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्या पिढीतला एक दुवाच निखळला आहे. वकिलीची सनद परदेशातून घेऊन आलेल्या उच्चशिक्षित श्री. कृष्णा यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत निरनिराळी पदे समर्थपणे सांभाळली. ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही होते, आणि २००४ ते २००८ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदारी पार पाडली. बंगळुरुचा चेहरा मोहरा आता पालटलाय. आयटी आणि औद्योगिक क्षेत्र म्हणून बंगळुरु जागतिक नकाशावर आले, पण त्याचे शिल्पकार श्री.कृष्णा हेच होते, हे विसरुन चालणार नाही. आधुनिक भारताचा विकास भविष्यात कुठल्या मार्गावरुन होणार, हे त्यांनी सर्वात आधी ओळखले. त्यांचे द्रष्टेपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दीपस्तं...
पुडूचेरीचे माजी मुख्यमंत्री एमडीआर रामचंद्रन यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय योगदान आणि समर्पित लोकसेवेमुळे ते निरंतर स्मरणात राहतील. ओम शांती

पुडूचेरीचे माजी मुख्यमंत्री एमडीआर रामचंद्रन यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. समाजाच्या विविध क्षेत्रात त्यांनी केलेले उल्लेखनीय योगदान आणि समर्पित लोकसेवेमुळे ते निरंतर स्मरणात राहतील. ओम शांती

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे सुरु होत असलेल्या महाकुंभ मेळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी उत्तर प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद हे देखील उपस्थित होते.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे सुरु होत असलेल्या महाकुंभ मेळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी उत्तर प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद हे देखील उपस्थित होते.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी