
हिन्द टीवी – मराठी
विकासाचा दीपस्तंभ हरपला
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या रुपाने आधुनिक भारताच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्या पिढीतला एक दुवाच निखळला आहे. वकिलीची सनद परदेशातून घेऊन आलेल्या उच्चशिक्षित श्री. कृष्णा यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत निरनिराळी पदे समर्थपणे सांभाळली. ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्रीही होते, आणि २००४ ते २००८ या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक जबाबदारी पार पाडली. बंगळुरुचा चेहरा मोहरा आता पालटलाय. आयटी आणि औद्योगिक क्षेत्र म्हणून बंगळुरु जागतिक नकाशावर आले, पण त्याचे शिल्पकार श्री.कृष्णा हेच होते, हे विसरुन चालणार नाही. आधुनिक भारताचा विकास भविष्यात कुठल्या मार्गावरुन होणार, हे त्यांनी सर्वात आधी ओळखले. त्यांचे द्रष्टेपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दीपस्तंभासारखे वाटते, आणि वाटत राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.
