
हिन्द टीवी – मराठी
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच माझ्या ६१व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहून मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे
शिवसेना आणि वैद्यकीय सेवा हे अतूट नाते असून सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जेव्हा गरज लागली होती, तेव्हा त्यांना शिवसेनेचीच रुग्णवाहिका मदतीला धावून गेली होती. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच वर्षात ४६० कोटी रुपयांची आर्थिक मदत आपण केली.
गावागावात कर्करोगाच्या तपासणीसाठी आपण गाड्या सोडत आहोत जेणेकरून या रोगाचे निदान लवकर झाल्यास त्यावर लवकर उपचार करता येतील. ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटलच्या मदतीने हृदयाला छिद्र असलेल्या पाच हजार बालकांवर आतापर्यंत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला. पालिका रुग्णालयात कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले असे याप्रसंगी नमूद केले.
राज्यातील जिल्हा आरोग्य केंद्र स्मार्ट व्हावीत यासाठी आपण त्यांचे श्रेणीवर्धन करतोय. आज या शिबिरात सर्वांची तपासणी होत आहे मात्र ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे तीदेखील मोफत करण्याची व्यवस्था आपण करू असे यासमयी स्पष्ट केले.
मुंबईतल्या या भागात हे महाआरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजन केल्यानंतर टप्याटप्याने इतर भागांत देखील महाआरोग्य शिबिर आयोजित करावे अशी सूचना यावेळी बोलताना केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव सिद्धेश कदम, आमदार मुरजी पटेल, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या सौ.कला शिंदे, अल्ताफ पेवेकर तसेच मुंबई पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक आणि या शिबिरात सहभागी झालेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
