
हिन्द टीवी – मराठी
कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीर चक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला.
विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांनी कॅप्टन यादव यांनी कारगिलच्या युद्धात ग्रेनेडियर म्हणून बजावलेल्या पराक्रमाचे कौतुक केले.
यावेळी महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते कॅप्टन यादव यांच्या पत्नी श्रीमती रीना यादव यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला तसेच राज्यपालांनी दोघांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आश्रयदाता डॉ. अश्विनी भिडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.
