Saturday, January 24News That Matters

मराठी भाषा विभागाची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली.- एकनाथ शिंदे

हिन्द टीवी – मराठी

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी करायच्या उपाययोजयाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर आणण्याच्या गरज असल्याचे यावेळी सांगितले. जागतिक स्तरावरील मराठीप्रेमी यांना साहित्याची ओळख व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. दृकश्राव्य स्वरूपात साहित्य उपलब्ध झाल्यास ते सहजतेने लोकांपर्यंत पोहोचू शकेल असेही याप्रसंगी सांगितले.

मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सुमारे ५०० बृहमंडळे कार्यरत आहेत. या बृहमंडळांमार्फत मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक बृहमंडळाला ५०० मराठी पुस्तके प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे परदेशातही मराठी भाषेची गोडी वाढेल असा विश्वास यासमयी व्यक्त केला.

मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना मराठीबद्दल माहिती व्हावे यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादी ठिकाणी क्यूआर कोड तयार करावेत. मराठीची जास्तीत जास्त पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचनाही यावेळी केली.

या बैठकीला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, सहसचिव नामदेव भोसले, भाषा संचालक विजया डोणीकर, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे आदी वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *