
हिन्द टीवी – मराठी
श्रीरंग अप्पांनी नक्की काही तरी पुण्याचे काम केले असणार की त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः स्वामी गोविंदगिरी महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
श्रीरंग अप्पा हे नगरसेवक पदापासून ते खासदारकीपर्यंत पोहचलेला एक कार्यकर्ता आहे. त्यांचा हा प्रवास प्रत्येक शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहे. यापूर्वी त्यांनी चार पुस्तके लिहिली असून हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. हा गुण त्यांच्याठायी आहे हे मला माहिती नव्हते असे सांगत या पुस्तकाचे कौतुक करून त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा नगरसेवक ते संसदरत्न हा प्रवास पाहिला तर ‘संघर्षयोद्धा’ हेच शीर्षक योग्यच असल्याचे मत याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी श्री रामजन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज, केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विजय शिवतारे, सुनील शेळके, महेंद्र थोरवे, राहुल कुल, उमताई खापरे, शंकर जगताप, अमित गोरखे तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
