
हिन्द टीवी – मराठी
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एन. एच. पाटील, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के. के. तातेड, आयोगाचे सदस्य संजय कुमार व एम. ए. सईद, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पद्मश्री शंकरबाबा पापळकर, आयोगाचे सचिव नितीन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग २०२४ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मानवी हक्क दिनाची या वर्षाची संकल्पना ‘अवर राईट्स, अवर फ्युचर, राईट नाऊ’ अशी आहे.
कार्यक्रमात अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाचं पुनर्वसन, दिव्यांग व्यक्तींचे हक्क, ज्येष्ठ नागरिक आणि आदिवासी कातकरी जमातीतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आदी विषयांवर चित्रफीत दाखवण्यात आली.
