Saturday, January 24News That Matters

हिन्द टीवी – मराठी 

   मराठी माणसाच्या मनात पर्यटनाची आवड रुजवून जगाची सफर करण्याची सवय लावणारे केसरीनाथ पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे.

   आपल्या अनोख्या कल्पकतेने आणि कौशल्यपूर्ण व्यवस्थापनाने पर्यटकांना जगभ्रमण करणारे व असंख्यांच्या जगण्यात जगातील आनंददायी अस्तित्वाच्या आठवणी पेरून अनुभवांनी अनेकांचे जीवन समृद्ध करणारे केसरीदादा हे पर्यटनक्षेत्राच्या पटलावरील बिनीचा मोहरा होते. – एकनाथ शिंदे 

केसरी टूर्सच्या नावाने आयोजित केलेल्या जगभरातील असंख्य सहलींतून त्यांनी देशाचे जागतिक संस्कृतीदूत म्हणून अनामपणे बजावलेल्या भूमिकेचा भारताच्या जागतिक प्रतिष्ठेत मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या निधनाने जगासोबतचा एक सांस्कृतिक दुवा निखळला आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाटील कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *