
हिन्द टीवी – मराठी
जगाच्या पटलावर भारताची बुद्धिमत्ता पुन्हा एकदा तेजाने झळकली. भारतीय बुद्धीबळपटू डी.गुकेश याने चीनचा ग्रँडमास्टर लिरेनला चेकमेट करत रचला नवा इतिहास.
सिंगापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा डी.गुकेश विश्वविजेता ठरला. त्याने अटीतटीच्या लढतीत चीनी प्रतिस्पर्धी डिंग लिरेनवर दणदणीत मात केली आहे. तमाम भारतवासीयांसाठी ही मोठ्या अभिमानाची बाब आहे. त्याचा खेळ देशातल्या बुद्धिबळपटूंना नेहमीच प्रेरणा देणारा ठरेल. या ऐतिहासिक आणि देदीप्यमान कामगिरीबद्दल डी.गुकेश यांचे हार्दिक अभिनंदन आणि बुद्धिबळ खेळातील भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.