उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे सुरु होत असलेल्या महाकुंभ मेळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी उत्तर प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद हे देखील उपस्थित होते.