Saturday, January 24News That Matters

Maharashtra

भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले – गर्वनर सी. पी. राधाकृष्णन

भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले – गर्वनर सी. पी. राधाकृष्णन

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी    
देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक

देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक

Maharashtra
हिन्द टीवी है मराठी     देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील.    अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली - एकनाथ शिंदे   ...
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व विश्व नेते नरेंद्र मोदीजी

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व विश्व नेते नरेंद्र मोदीजी

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व विश्व नेते मा.नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात विक्रमी जनादेश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर, 'विकसित भारताच्या वाटचालीत राज्याचा योगदानाबाबत मा. मोदीजी यांच्याशी चर्चा करता आली. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे हे दोघेही उपस्थित होते....
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डाजी यांची आज नवी दिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे यांच्यासह भेट घेतली

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डाजी यांची आज नवी दिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे यांच्यासह भेट घेतली

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा साथीदार असलेल्या शिवसेनेला राज्यातील निवडणुकामध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी आरोग्य क्षेत्रातील विविध विषयांबाबत चर्चा झाली. यासयी नड्डाजी यांना पारंपरिक शाल आणि प्रभू श्रीरामाची मूर्ती भेट दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     देशाचे कणखर नेतृत्व केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची आज नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महायुतीच्या सरकारची वाटचालीबाबत अमितभाई यांच्याशी चर्चा झाली. या भेटीच्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी अमितभाईंना पारंपरिक शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली....
‘ राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन ‘ म्हणून संपूर्ण देशभर साजरा करीत असतो

‘ राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन ‘ म्हणून संपूर्ण देशभर साजरा करीत असतो

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी नागरिक बंधू - भगिनींनो २४ डिसेंबर हा आजचा दिवस आपण ' राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन ' म्हणून संपूर्ण देशभर साजरा करीत असतो. या दिनाचे औचित्य साधून काही महत्वाच्या बाबी अधोरेखित होणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू खरेदी करताना आपण खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती ( M.R.P. ), त्या वस्तूंची मुदत संपण्याची तारीख (expiry date), वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.  खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काही दोष असल्यास आपल्या मुला-बाळांना त्याची बाधा होऊ शकते, म्हणूनच खरेदी केलेल्या वस्तूंची पावती ( RECIEPT ) घेण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. ' ग्राहक राजा ' आहे असे नुसते बोलून चालणार नाही, तर तेवढीच जागरूकता आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दाखवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा हो...
राष्ट्रीय गणित दिन निमित्त माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षक बांधवांना तसेच गणितज्ञ, वैज्ञानिक व शास्त्रज्ञांना राष्ट्रीय गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

राष्ट्रीय गणित दिन निमित्त माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षक बांधवांना तसेच गणितज्ञ, वैज्ञानिक व शास्त्रज्ञांना राष्ट्रीय गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       आपल्या लाभलेल्या अत्यंत अल्पायुष्यामध्ये फक्त गणित याच विषयाचा गहन अभ्यास करून गणिताला अलौकिक उंची प्राप्त करून देणारे महान भारतीय गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गणित विषयातील अलौकिक योगदानास विनम्र अभिवादन है - शिंदे  श्रीनिवास रामानुजन यांच्या गणितातील कार्याची महती आपल्या स्मरणात रहावी याकरिता करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणित दिन निमित्त माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी, शिक्षक बांधवांना तसेच गणितज्ञ, वैज्ञानिक व शास्त्रज्ञांना राष्ट्रीय गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
पत्रकारांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन

पत्रकारांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल गुरुवारी नागपूर येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने मुंबई तसेच नागपूर येथील संपादक आणि पत्रकार बंधू भगिनींसोबत अनौपचारिक संवाद साधला.  यावेळी सहकारी मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, दादाजी भुसे आणि भरतशेठ गोगावले, पक्षप्रवक्ते राजू वाघमारे आणि राहुल लोंढे हेदेखील उपस्थित होते....
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ दरम्यान राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ दरम्यान राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ दरम्यान राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन सोहळ्याला उपस्थित राहून राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. तसेच यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री व आमदारांशी संवाद साधला.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तसेच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री आणि आमदार उपस्थित होते....
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पदाधिकाऱ्यांची बैठक

इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज राजभवन, मुंबई येथे झाली.  यावेळी नागरिकांना आर्थिक साक्षर करण्यावर भर देणे, वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावणे, अभ्यासक्रम समितीमध्ये सीए चा समावेश करणे आदींसह शासन आणि आयसीएआय यांच्या एकत्रित प्रयत्नातून देशाची आर्थिक प्रगती साधण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.  यावेळी आयसीएआयचे अध्यक्ष रणजित कुमार अगरवाल, उपाध्यक्ष चरणज्योत सिंग नंदा, माजी अध्यक्ष जी.रामास्वामी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते....