
हिन्द टीवी – मराठी
नागरिक बंधू – भगिनींनो
२४ डिसेंबर हा आजचा दिवस आपण ‘ राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन ‘ म्हणून संपूर्ण देशभर साजरा करीत असतो. या दिनाचे औचित्य साधून काही महत्वाच्या बाबी अधोरेखित होणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू खरेदी करताना आपण खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती ( M.R.P. ), त्या वस्तूंची मुदत संपण्याची तारीख (expiry date), वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.
खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काही दोष असल्यास आपल्या मुला-बाळांना त्याची बाधा होऊ शकते, म्हणूनच खरेदी केलेल्या वस्तूंची पावती ( RECIEPT ) घेण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. ‘ ग्राहक राजा ‘ आहे असे नुसते बोलून चालणार नाही, तर तेवढीच जागरूकता आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दाखवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा होईल. आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने आपण सगळे निर्धार करूया की आपण नुसतेच ग्राहक न होता सुजाण आणि जागरूक ग्राहक बनूया. जागो ग्राहक जागो.