
हिन्द टीवी – मराठी
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज राजभवन, मुंबई येथे झाली.
यावेळी नागरिकांना आर्थिक साक्षर करण्यावर भर देणे, वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावणे, अभ्यासक्रम समितीमध्ये सीए चा समावेश करणे आदींसह शासन आणि आयसीएआय यांच्या एकत्रित प्रयत्नातून देशाची आर्थिक प्रगती साधण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी आयसीएआयचे अध्यक्ष रणजित कुमार अगरवाल, उपाध्यक्ष चरणज्योत सिंग नंदा, माजी अध्यक्ष जी.रामास्वामी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
