Saturday, January 24News That Matters

Maharashtra

पवित्र स्मृतीस विनम्र श्रद्धांजली!

पवित्र स्मृतीस विनम्र श्रद्धांजली!

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार जिवापाड जपून शिवसेनेला मोठे करणारे आदरणीय नेते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहिले, ते शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या दुःखद निधनामुळे एक कडवट शिवसैनिक आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विश्वासू समर्थक काळाच्या पडद्याआड गेला.      अशा लढवय्या, निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकांमुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेस आज जनमानसात प्रेम आणि आपुलकीचे स्थान प्राप्त झाले आहे.    रघुनाथ मोरे साहेब यांचे मार्गदर्शन आणि संस्कार आम्ही कधीच विसरणार नाही. भविष्यातही ते आम्हाला सतत प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या निष्ठेच्या संस्काराचे निष्ठापूर्वक पालन करणे हीच आमची त्यांना आदरांजली असेल. आयुष्यभरातील सेवाभावी समाजकार्यातून गोळा केलेल्या पुण्याईमुळे त्य...
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती

श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या सहवासात राहून अध्यात्माचं चिंतन करत, समाजाला एकता व बंधुभाव जपण्याचा संदेश आपल्या अभंगांच्या माध्यमातून देणारे, समाज प्रबोधनाचे अमूल्य कार्य करणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  ...
६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादरच्या चैत्यभूमीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादरच्या चैत्यभूमीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी         यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन दुर्मीळ छायाचित्रे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. तसेच या कार्यक्रमात माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या 'भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच बाबासाहेबांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करत आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. इंदू मिलचे स्मार...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने येणाऱ्या अनुयायांसाठी आयोजित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने येणाऱ्या अनुयायांसाठी आयोजित

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने येणाऱ्या अनुयायांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भोजन कक्षाला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच जमलेल्या अनुयायांची आस्थेने विचारपूस केली.  यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार दीपक केसरकर, प्रवक्ते राहुल लोंढे आणि राजू वाघमारे आदी उपस्थित होते....
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन २०२४ ला आज सुरुवात

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन २०२४ ला आज सुरुवात

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी          महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन २०२४ ला आज सुरुवात झाली. या निमित्ताने विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. राज्यात नव्याने स्थापन झालेले महायुतीचे सरकार शिवछत्रपतींच्या विचारांना अभिप्रेत असलेला कारभार करेल असा दृढसंकल्प यावेळी केला.  छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाचा जयजयकार करत सहकारी आमदारांनी विजयाचा जल्लोष केला.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते....
मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मानवतेची शिकवण देणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Maharashtra
हिन्द टीवी-मराठी       
विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली.

विधानसभेचे जेष्ठ सदस्य कालीदास सुलोचना निळकंठ कोळंबकर यांना आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी     राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळयात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष पदाची शपथ दिली.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विधानमंडळ सचिव ( कार्यभार) राजेंद्र भागवत आदि उपस्थित होते. राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने सांगता झाली....
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

Maharashtra
 हिन्द टीवी - मराठी  आझाद मैदान मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे व अजित आशाताई अनंतराव पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.  राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर पंतप्रधानांनी तिघांचेही अभिनंदन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सांगता झाली.  कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.  ...
चौपनाव्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’

चौपनाव्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      चौपनाव्या विजय दिवसानिमित्त आयोजित 'विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन'ला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. या मॅरॅथॉनचे आयोजन स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे करण्यात आले.  मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली. ...
शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिना

शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिना

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी      भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.   यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या 'डॉ बाबासाहेब आंबेडकर : भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले....