
हिन्द टीवी – मराठी
यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन दुर्मीळ छायाचित्रे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. तसेच या कार्यक्रमात माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच बाबासाहेबांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करत आहोत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. इंदू मिलचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधणार असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, राहुल शेवाळे, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, अमर साबळे, अमोल मिटकरी, राजकुमार बडोले, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी आणि इतर अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
