
हिन्द टीवी – मराठी
चौपनाव्या विजय दिवसानिमित्त आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’ला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. या मॅरॅथॉनचे आयोजन स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयातर्फे करण्यात आले.

मॅरेथॉनच्या सुरुवातीला राज्यपालांनी कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली.
