
हिन्द टीवी – मराठी
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन २०२४ ला आज सुरुवात झाली. या निमित्ताने विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. राज्यात नव्याने स्थापन झालेले महायुतीचे सरकार शिवछत्रपतींच्या विचारांना अभिप्रेत असलेला कारभार करेल असा दृढसंकल्प यावेळी केला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाचा जयजयकार करत सहकारी आमदारांनी विजयाचा जल्लोष केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते.
