
हिन्द टीवी – मराठी
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार जिवापाड जपून शिवसेनेला मोठे करणारे आदरणीय नेते म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहिले, ते शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या दुःखद निधनामुळे एक कडवट शिवसैनिक आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विश्वासू समर्थक काळाच्या पडद्याआड गेला.
अशा लढवय्या, निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिकांमुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेस आज जनमानसात प्रेम आणि आपुलकीचे स्थान प्राप्त झाले आहे.
रघुनाथ मोरे साहेब यांचे मार्गदर्शन आणि संस्कार आम्ही कधीच विसरणार नाही. भविष्यातही ते आम्हाला सतत प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या निष्ठेच्या संस्काराचे निष्ठापूर्वक पालन करणे हीच आमची त्यांना आदरांजली असेल. आयुष्यभरातील सेवाभावी समाजकार्यातून गोळा केलेल्या पुण्याईमुळे त्यांना ईश्वर सद्गती देईल ही आमची भावना आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र श्रद्धांजली!
