हिन्द टीवी-मराठी
'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत नागालँड व आसाम राज्य स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन एसएनडीटी महिला विद्यापीठ व 'ईश्वरपूरम पुणे' या उत्तर पूर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले.
यावेळी 'ईश्वरपूरम' संस्थेतील नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले, तर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य व आसामी लोकगीत सादर केले.
राज्यपालांच्या हस्ते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, ईश्वरपूरम संस्थेचे अध्यक्ष विनीत कुबेर, संस्थापक सदस्य प्रशांत जोशी यांसह उपस्थित वि...
हिन्द टीवी - मराठी
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज युनिसेफच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट - २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य' या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे करण्यात आले.
या वर्षीच्या अहवालात लोकसंख्याशास्त्रीय बदल, हवामान आणि पर्यावरणातील तीव्र बदल आणि तंत्रज्ञानातील स्थित्यंतरामुळे सन २०५० पर्यंत आणि त्यापुढील काळात मुलांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याचे विवेचन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह, युसूफ कबीर, स्वाती महापात्रा आणि पर्यावरण प्रेमी युवक गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा उपस्थित होते....
हिन्द टीवी - मराठी
दिनांक 29/11/2024 रोजी कापूरबावडी पोलीस स्टेशन पहिला मळा येथे मा. सहा. पोलीस आयुक्त, वर्तक नगर विभाग मंदार जावळे, यांनी कापूरबावडी, वर्तक नगर, चितळसर, कासारवडवली मधील पोलीस मित्रांची बैठक घेवून त्यांना ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राईम, अँटी नार्कोटिक्स, गुड टच बॅड टच, सामुदायिक पोलिसिंग या विषयावरती माहिती देण्यात आली तसेच नवीन कायदे, डायल 112 ची उपयुक्तता बाबत माहिती देण्यात आली. माननीय पोलीस आयुक्त सो ठाणे शहर यांचे संकल्पनेनुसार ठाणे शहर पोलीस व ईगल ब्रिगेड फाउंडेशन चे अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर यानीं सामजिक संस्था सेवा यांनी वैयक्तिक आणि सायबर सुरक्षितता, अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत जागरूकता, सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या समर्थन प्रणाली आणि संसाधनाची माहिती तसेच पोलीस मित्रामध्ये नव चैतन्य निर्माण करण्यात आले व कायदा व सुव्यवस्थेबाबत शिक्षीत करणेचे अनुषंगाने सुरक्षा...
हिन्द टीवी - मराठी
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'मेरा युवा भारत : वतन को जानो' कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीर च्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल.- राज्यपाल राधाकृष्णन
...
हिन्द टीवी - मराठी
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी जाहीर केले. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबिंयांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या....