गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’ (PMNRF) मधून मृतांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपये तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.