
हिन्द टीवी – मराठी
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज युनिसेफच्या ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन रिपोर्ट – २०२४ : बदलत्या विश्वात लहान मुलांचे भवितव्य’ या विषयावरील अहवालाचे प्रकाशन राजभवन मुंबई येथे करण्यात आले.
या वर्षीच्या अहवालात लोकसंख्याशास्त्रीय बदल, हवामान आणि पर्यावरणातील तीव्र बदल आणि तंत्रज्ञानातील स्थित्यंतरामुळे सन २०५० पर्यंत आणि त्यापुढील काळात मुलांच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याचे विवेचन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला युनिसेफ महाराष्ट्रचे मुख्य अधिकारी संजय सिंह, युसूफ कबीर, स्वाती महापात्रा आणि पर्यावरण प्रेमी युवक गुरप्रीत कौर आणि पूजा विश्वकर्मा उपस्थित होते.
