
हिन्द टीवी – मराठी
दिनांक 29/11/2024 रोजी कापूरबावडी पोलीस स्टेशन पहिला मळा येथे मा. सहा. पोलीस आयुक्त, वर्तक नगर विभाग मंदार जावळे, यांनी कापूरबावडी, वर्तक नगर, चितळसर, कासारवडवली मधील पोलीस मित्रांची बैठक घेवून त्यांना ऑनलाइन फ्रॉड, सायबर क्राईम, अँटी नार्कोटिक्स, गुड टच बॅड टच, सामुदायिक पोलिसिंग या विषयावरती माहिती देण्यात आली तसेच नवीन कायदे, डायल 112 ची उपयुक्तता बाबत माहिती देण्यात आली. माननीय पोलीस आयुक्त सो ठाणे शहर यांचे संकल्पनेनुसार ठाणे शहर पोलीस व ईगल ब्रिगेड फाउंडेशन चे अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर यानीं सामजिक संस्था सेवा यांनी वैयक्तिक आणि सायबर सुरक्षितता, अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत जागरूकता, सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या समर्थन प्रणाली आणि संसाधनाची माहिती तसेच पोलीस मित्रामध्ये नव चैतन्य निर्माण करण्यात आले व कायदा व सुव्यवस्थेबाबत शिक्षीत करणेचे अनुषंगाने सुरक्षा सत्राचे आयोजन करण्यात आले.
सदर वेळी पोलीस मित्रांना आपापल्या पोलिस ठाणे हद्दीतील गोपनीय पोलीस अंमलदार यांना भेटून नवीन पोलीस मित्र यादी तयार करणे, व आपले हद्दीमध्ये अमली पदार्थाचे व्यसन मुलांना कशा प्रकारे लागले जाते आणि त्यापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे कोणत्या प्रकारची दक्षता अथवा काळजी घेतली पाहिजे तसेच सायबर सुरक्षितता या विषयावर सुद्धा मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केली. पोलीस मित्र यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबांनी समाधानकारक उत्तरे दिली तसेच त्यांना अमली पदार्थ बाबत माहिती दिली. पोलीस ठाण्याचे सदर मिटींगला 80 ते 100 पोलीस मित्र उपस्थित होते.
