‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत ‘युवा संगम’ कार्यक्रमाचा भाग म्हणून आयआयटी भुवनेश्वर तसेच ओडिशा येथील इतर राष्ट्रीय संस्थांमधील विद्यार्थी महाराष्ट्र भेटीवर आले असून आज या विद्यार्थी सदस्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. मुंबई भेटीचे आयोजन व समन्वय आयआयएम मुंबई या संस्थेतर्फे करण्यात आला.