Saturday, January 24News That Matters

Author: Admin Admin

ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष व ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन

ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष व ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ शिवसेना नेते, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष व ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. ठाणे शहर व परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ४४ वर्षांपूर्वी ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू करून त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या निधनाने ठाणे शहराची आणि शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तस्वकीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली....
ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात

ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी    बठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर, ज्येष्ठ शिवसेना नेते तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले.  आज ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. तसेच समस्त शिवसेना परिवाराच्या वतीने सतीश प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, प्रा.प्रदीप ढवळ तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधि...
पुन्हा एकदा भारतीयातर्फे चेकमेट

पुन्हा एकदा भारतीयातर्फे चेकमेट

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी  सिंगापूरच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील डी.गुकेशच्या देदीप्यमान यशापाठोपाठ भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हंपी 'वर्ल्ड रॅपिड चेस' चॅम्पियन. ISWOTY स्पर्धेतील कोनेरू हंपी हिच्या यशाने भारताच्या ‘बुद्धिबळा’त आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारताच्या बुद्धिबळपटू कोनेरू हंपीने तब्बल दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचं पद जिंकलं आहे. त्यांनी इंडोनेशियाच्या इरिन सुकंदर हिला पराभूत करत एक नवीन इतिहास रचला. कोनेरू हंपी, तुझ्या या देदीप्यमान कामगिरीचा आम्हा तमाम भारतीयांना अभिमान आहे. तुझे मनःपूर्वक अभिनंदन आणि बुध्दिबळातील भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. - एकनाथ शिंदे ...
सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील एक आदरणीय नेते व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधन

सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील एक आदरणीय नेते व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधन

Maharashtra
हिन्द टीवी-मराठी      नागपूरच्या सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील एक आदरणीय नेते व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. - एकनाथ शिंदे ...
महाराष्ट्र राजभवन कॅलेंडर – २०२५

महाराष्ट्र राजभवन कॅलेंडर – २०२५

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी नोव्हेंबर महिन्यात जे जे स्कुल ऑफ आर्ट सह इतर संस्थांमधील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांची व कलाकारांची कार्यशाळा राजभवन येथे आयोजित करण्यात आली होती.  ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे व गांधी फिल्म फाऊंडेशनचे संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  या कार्यशाळेत सहभागी कलाकार व विद्यार्थ्यांनी राजभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारा व निसर्गाला कॅनव्हासवर चितारले.  यातील निवडक पेंटिंग तसेच यापूर्वीच्या कार्यशाळेतील काही पेंटिंग्स यांची निवड करून २०२५ वर्षाचे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. संकल्पना: पद्मश्री सुधारक ओलवे । क्युरेटर : संजय निकम ।  समन्वय : उमेश काशीकर, जनसंपर्क अधिकारी, राजभवन ।  डिझाईन: नागोराव रोडेवाड     ...
माजी केंद्रीय मंत्री आणि सध्या राज्यसभा सदस्य असलेल्या जी. के. वासन यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

माजी केंद्रीय मंत्री आणि सध्या राज्यसभा सदस्य असलेल्या जी. के. वासन यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

National
हिन्द टीवी - मराठी
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे नवी दिल्ली येथे अंत्यदर्शन घेतले व त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे नवी दिल्ली येथे अंत्यदर्शन घेतले व त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी
ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधना

ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधना

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी    ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले.   देशातील निवडक विचारवंत चित्रपट निर्मात्यांच्या यादीत श्री श्याम बेनेगल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. समांतर चित्रपटात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली अमिट छाप सोडली.  अंकुर, निशांत आणि मंथन यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक वास्तवाचे चित्रण मांडण्याचे धैर्य दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रतिभावंत कलाकार जगासमोर आले. 'भारत एक खोज' या ऐतिहासिक दूरदर्शन मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लाखो प्रेक्षकांना भारताच्या गौरवशाली इतिहासाची नव्याने ओळख करून दिली.    त्यांच्या निधनामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक असणारा एक प्रतिभावंत निर्माता - दिग्दर्शक गमावlले आहे....