
हिन्द टीवी – मराठी
नोव्हेंबर महिन्यात जे जे स्कुल ऑफ आर्ट सह इतर संस्थांमधील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांची व कलाकारांची कार्यशाळा राजभवन येथे आयोजित करण्यात आली होती.
ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे व गांधी फिल्म फाऊंडेशनचे संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत सहभागी कलाकार व विद्यार्थ्यांनी राजभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारा व निसर्गाला कॅनव्हासवर चितारले.
यातील निवडक पेंटिंग तसेच यापूर्वीच्या कार्यशाळेतील काही पेंटिंग्स यांची निवड करून २०२५ वर्षाचे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे.
संकल्पना: पद्मश्री सुधारक ओलवे । क्युरेटर : संजय निकम ।
समन्वय : उमेश काशीकर, जनसंपर्क अधिकारी, राजभवन ।
डिझाईन: नागोराव रोडेवाड