
हिन्द टीवी – मराठी
बठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर, ज्येष्ठ शिवसेना नेते तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले.

आज ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वनही केले. तसेच समस्त शिवसेना परिवाराच्या वतीने सतीश प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, प्रा.प्रदीप ढवळ तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.-एकनाथ शिंदे