
हिन्द टीवी – मराठी
हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ शिवसेना नेते, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष व ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले. ठाणे शहर व परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ४४ वर्षांपूर्वी ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू करून त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या निधनाने ठाणे शहराची आणि शिवसेनेची मोठी हानी झाली आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तस्वकीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
