
हिन्द टीवी – मराठी
ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती_संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नागपूर या जिल्ह्यांतील उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टी पक्षांतील शेकडो सरपंच, पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांनी आज भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील आनंदआश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या सर्वांचे याप्रसंगी पक्षात हार्दिक स्वागत करून त्याना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने प्रचंड काम केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.
लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना त्यांची जागा दाखवली. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवले. कोणत्याही पदापेक्षा २ कोटी ३९ लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी सगळ्यात मोठे पद असल्याचे याप्रसंगी नमूद केले. आपण प्रवेश करून शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. विधानसभेप्रमाणेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महायुतीला प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, खासदार संदिपान भुमरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार शांताराम मोरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. – एकनाथ शिंदे
