
हिन्द टीवी – मराठी
वागड विकास संघाच्या वतीने मुंबईतील दादर येथील योगी सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विराट वागड संमेलना’ला उपस्थित राहून वागड समाजातील बांधवांशी संवाद साधला. है एकनाथ शिंदे
यावेळी शिवसेनेचे आमदार मुरजीभाई पटेल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. या निमित्ताने राज्याच्या विधानसभेत वागड समाजाचा पहिला आमदार निवडून गेला असल्याचे यावेळी नमूद केले.
वागड समाज हा वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहत असून महाराष्ट्राच्या विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाने वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सोबत काम केले आहे. दिघे साहेब नेहमी म्हणायचे की कोणतेही नगर वसले तरीही जोपर्यंत तिथे बाजारपेठ येत नाही तोवर त्या शहराला शोभा येत नाही. त्यामुळे प्रत्येक शहराची शोभा आपला वागड समाज वाढवत असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून ५ कोटी लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून दिले. ‘लाडकी बहीण योजने’च्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना पंधराशे रुपये दिले. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त केले. पुढील दोन वर्षात सर्व रस्ते काँक्रीटचे होऊन लोकांना दिलासा मिळेल. समाज आणि प्रशासन एकत्र येऊन काम करते तेव्हा राज्यात प्रगती होते. आज सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. हा क्रमांक अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना काम करायचे असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.
यावेळी वागड समाजातील वीरेंद्र सिंह, वासन अहिर, बाबूलाल शाह, वीरेंद्रसिंह जाडेजा, लक्ष्मीचंद चरला, बच्चूभाई सोडा, मुकेश गाला, के.बी. रिठा, विपुल शास्त्री, कुलदीपसिंह जाडेजा आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.
