
हिन्द टीवी – मराठी, पुणे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावचे ग्रामदैवत असलेल्या मेसाई देवीचा पटनाम सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित राहून मेसाई देवीचे मनोभावे दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घेतला. है एकनाथ शिंदे

यावेळी माझे जुने सहकारी आणि कान्हूर मेसाई गावचे रहिवासी पोपट धोत्रे यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. कान्हूरवासीयांनी याप्रसंगी माझे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यावेळी आबालवृद्धांनी केलेल्या स्वागताने आणि दाखवलेल्या आपुलकीने मी भारावून गेलो. ग्रामस्थांनी यासमयी ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात माझे जागोजागी स्वागत केले.
यावेळी पोपट धोत्रे यांचा संपूर्ण परिवार तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, आमदार शरद सोनावणे, जिल्हाप्रमुख विद्याधर पोखरकर, अल्पसंख्याक आघाडीचे सईद शेख, विठ्ठल खर्डे, रामा भंडारी, सचिन उबाळे, भरत गायकवाड, प्रवीण बांदल तसेच कान्हूर देसाई गावचे ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.