
हिन्द टीवी – मराठी
मुंबईतील नेव्ही चिल्ड्रन स्कुल येथे इयत्ता बारावीत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयन या विद्यार्थिनीने जगाच्या सात खंडातील सात सर्वोच्च शिखरे सर करून अश्या प्रकारचा विक्रम करणारी जगातील सर्वात लहान महिला गिर्यारोहक झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन !!
२४ डिसेंबरला काम्या कार्तिकेयनने आपले वडील भारतीय नौदलातील कमांडर एस कार्तिकेयन यांचेसह अंटार्क्टिका येथील माऊंट व्हिन्सेटवर पाऊल ठेवून हा इतिहास घडवला आहे. या कामगिरीबद्दल कमांडर कार्तिकेयन यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन !!
