Saturday, January 24News That Matters

शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण

हिन्द टीवी – मराठी, मुंबई

       २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात जवान, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या स्मरणार्थ आज एकनाथ शिंदे मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना विनम्र अभिवादन केले. यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांना भेटून त्यांनाही धीर दिला. 

यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस तसेच राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *