
हिन्द न्यूज़ – मराठी
भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राजभवन, मुंबई येथे विधानसभा निवडणूक निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी व राजपत्राची प्रत सादर केली।
यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते।

