Saturday, January 24News That Matters

Maharashtra

सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील एक आदरणीय नेते व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधन

सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील एक आदरणीय नेते व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधन

Maharashtra
हिन्द टीवी-मराठी      नागपूरच्या सामाजिक तसेच राजकीय चळवळीतील एक आदरणीय नेते व माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. - एकनाथ शिंदे ...
महाराष्ट्र राजभवन कॅलेंडर – २०२५

महाराष्ट्र राजभवन कॅलेंडर – २०२५

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी नोव्हेंबर महिन्यात जे जे स्कुल ऑफ आर्ट सह इतर संस्थांमधील चित्रकलेच्या विद्यार्थ्यांची व कलाकारांची कार्यशाळा राजभवन येथे आयोजित करण्यात आली होती.  ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे व गांधी फिल्म फाऊंडेशनचे संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.  या कार्यशाळेत सहभागी कलाकार व विद्यार्थ्यांनी राजभवनातील विविध ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारा व निसर्गाला कॅनव्हासवर चितारले.  यातील निवडक पेंटिंग तसेच यापूर्वीच्या कार्यशाळेतील काही पेंटिंग्स यांची निवड करून २०२५ वर्षाचे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे. संकल्पना: पद्मश्री सुधारक ओलवे । क्युरेटर : संजय निकम ।  समन्वय : उमेश काशीकर, जनसंपर्क अधिकारी, राजभवन ।  डिझाईन: नागोराव रोडेवाड     ...
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे नवी दिल्ली येथे अंत्यदर्शन घेतले व त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे नवी दिल्ली येथे अंत्यदर्शन घेतले व त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी
ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधना

ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधना

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी    ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक पद्मभूषण श्याम बेनेगल यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले.   देशातील निवडक विचारवंत चित्रपट निर्मात्यांच्या यादीत श्री श्याम बेनेगल यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. समांतर चित्रपटात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली अमिट छाप सोडली.  अंकुर, निशांत आणि मंथन यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक वास्तवाचे चित्रण मांडण्याचे धैर्य दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रतिभावंत कलाकार जगासमोर आले. 'भारत एक खोज' या ऐतिहासिक दूरदर्शन मालिकेच्या माध्यमातून त्यांनी लाखो प्रेक्षकांना भारताच्या गौरवशाली इतिहासाची नव्याने ओळख करून दिली.    त्यांच्या निधनामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक असणारा एक प्रतिभावंत निर्माता - दिग्दर्शक गमावlले आहे....
राजभवन, मुंबई येथे नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न झाले

राजभवन, मुंबई येथे नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न झाले

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी       महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन, मुंबई येथे नाताळ निमित्त स्नेहमिलन संपन्न झाले. यावेळी राज्यपालांनी केक कापून सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नागपूर आर्चडायोसीसचे फादर थॉमस जोसेफ, कल्याण धर्मप्रांताचे फादर राजेश, डॉमिनिकन धर्मसंघाचे फादर पॉल पुलेन तसेच सेंट पॉल धर्मसंघाचे फादर व सिस्टर्स तसेच ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.  ...
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संगीत क्षेत्रातील कलाकारांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संगीत क्षेत्रातील कलाकारांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संगीत क्षेत्रातील कलाकारांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार' प्रदान करण्यात आले. ‘स्पंदन आर्ट्स’ संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते स्व. मजरुह सुलतानपुरी यांना ‘मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार' (मरणोत्तर) तसेच पार्श्वगायक जावेद अली यांना २०२४ वर्षाचा 'मोहम्मद रफी पुरस्कार' प्रदान करण्यात आला. स्व. मजरुह सुलतानपुरी यांच्या वतीने त्यांचे पुत्र अंदलीब सुलतानपुरी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ॲड. प्रतिमा शेलार तसेच मोहम्मद रफी, मजरुह सुलतान पुरी व जावेद अली यांचे कुटुंबीय उपस्थित होते....
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते. - महाराष्ट्र गवर्नर सी. पी. राधाकृष्णन ...
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक पद्मभूषण एम.टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक पद्मभूषण एम.टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी, महाराष्ट्र     विलक्षण प्रतिभावान व्यक्तिमत्त्व असलेल्या नायर यांनी साहित्य आणि सिनेमा क्षेत्रातील अमूल्य योगदानाने आपल्या सांस्कृतिक विश्वावर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांचे साहित्य विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित होणे गरजेचे आहे.   या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि त्यांच्या चाहत्यांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. ॐ शांती - गवर्नर सी पी राधाकृष्णन   ...
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.

Maharashtra
हिन्द टीवी - मराठी डॉ. मनमोहन सिंह हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. डॉ. मनमोहन सिंह विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी मी आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो. ओम शांती - सी.पी.राधाकृष्णन...