
हिन्द टीवी – मराठी
मुख्यमंत्री असताना मी नेहमी म्हणायचो की मी ‘सीएम’ म्हणजे ‘मुख्यमंत्री’ नसून कॉमन मॅन आहे तर उपमुख्यमंत्री म्हणजे डिसीएम झाल्यावर मी डीसीएम म्हणजे मी ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ आहे असं सांगू लागलो.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त एका सहृदाने मला ही अनोखी भेट देऊ केली. ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून जन्म घेतलेल्या ‘कॉमन मॅन’ने मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर हात टाकला आहे अशी ही प्रतिमा आहे. कॉमन मॅनने माझ्या खांद्यावर विश्वासाने टाकलेला हात, हीच माझी त्याच्यासाठी सदैव कार्यरत राहण्यामागची प्रेरणा आहे.
धन्यवाद मित्रा…
तुझा विश्वासु,
एकनाथ शिंदे
डिसीएम अर्थात ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’
