
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी टीम इंडियाचे दिमाखदार यश संपादन
हिन्द टीवी – मराठी
सर्वप्रथम टॉस जिंकून इंग्लंडने भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. कर्णधार रोहित शर्मा लवकर आऊट झाल्यानंतर उपकर्णधार शुभमन गिलने फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. इंग्लिश गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत त्याने ११२ धावांची खेळी केली. विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय धावसंख्येला आकार दिला. के.एल.राहूल तसेच इतर फलंदाजांनी मौलिक खेळी करत ३५६ धावांचा डोंगर उभारला.
त्यानंतर सर्वच भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना तोंड वर काढू दिले नाही. भारतीय क्रिकेट संघाने संघभावनेतून मिळवलेला विजय तरुण खेळाडूंना एक आदर्श आहे. भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी मनःपूर्वक शुभेच्छा. – एकनाथ शिंदे
