
हिन्द टीवी – मराठी
हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरकांच्या स्तरावर ऑनलाईन करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे. सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा असून यासाठी वाहन वितरकांना वाहन मालकाचा नोंदणी अर्ज www.parivahan.gov.in वर करावा लागणार आहे.
हलक्या मालवाहू वाहनांच्या फेसलेस नोंदणीमुळे नोंदणी प्रक्रिया विनासायास होऊन वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांनी या सेवेचा लाभा घ्यावा, नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण आल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. – परिवहन आयुक्त विवेक भिमनवार
